Surprise Me!

Nave Lakshya | नवे लक्ष्य’ मालिकेत इन्सपेक्टर रेणुका राठोड आणि सलोनी देशमुखची धमाकेदार एण्ट्री |

2022-04-08 5 Dailymotion

‘नवे लक्ष्य’ या मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे यांची धमाकेदार एण्ट्री होणार आहे. नवे लक्ष्यच्या पहिल्या पर्वात म्हणजेच लक्ष्य मालिकेत रेणुका राठोड आणि सलोनी देशमुख या दोन्ही व्यक्तिरेखा खूप गाजल्या होत्या. त्यामुळे ही गाजलेली पात्र मालिकेत पुन्हा पाहायला मिळतील. यानिमित्ताने युनिट ८ आणि युनिट ९ एकत्र येऊन आठ वर्षांपूर्वींच्या केसचा गुंता सोडवणार आहेत. अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे जुनी भूमिका नव्याने साकारण्यासाठी सज्ज झाल्या असून नवे लक्ष्यच्या टीमसोबत काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.<br /><br />

Buy Now on CodeCanyon